अलीकडच्या काळात जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना प्रत्यक्षपणे पाहण्यासाठी जंगल पर्यटनाचे प्रमाण वाढत आहे. मात्र, अजूनही प्रत्येकालाच हे शक्य होत नाही. यामुळेच नव्या पिढीला चित्रात दिसणारे जंगलातील प्राणी प्रत्यक्ष पाहता यावेत यासाठी प्राणी संग्रहालये उभारण्यात येतात.

पुण्यामध्येही कात्रज येथे राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे. या प्राणीसंग्रहालयात हत्ती, वाघ यासह दुर्मिळ प्रजातींचे वाघ व इतर दुर्मिळ प्राणी नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. प्राणी संग्रहालयाला भेट दिल्यानंतर आपणही आपल्या आवडत्या प्राण्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं. पण ते कसं हा मोठा प्रश्न राहतोच. यासाठीच पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाची लोकसहभागातून वन्यजीवांचे संगोपन करण्यासाठी प्राणी दत्तक योजना आहे.

या योजनेअंतर्गत तुम्ही तुम्हाला आवडणारा अगदी कोणताही प्राणी दत्तक घेऊ शकता. कोणताही म्हणजे खरंच कोणताही! अगदी हत्ती आणि वाघदेखील. मात्र, तुम्हाला या प्राण्यांना घरी घेऊन जाण्याऐवजी प्राणी संग्रहालयातच त्यांचे पालकत्व स्वीकारावे लागते.

This slideshow requires JavaScript.

दत्तक योजनेअंतर्गत शहरातील नागरिक किंवा संस्था प्राणी संग्रहालयातील एक किंवा अनेक प्राण्यांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत करु शकतात. प्राण्यांचे पोषक खाद्य, वैद्यकीय उपचार आणि संगोपनासाठी या रकमेचा उपयोग केला जाईल.

प्राणी दत्तक योजनेअंतर्गत दत्तक घेता येणाऱ्या प्राण्यांची नावे व दत्तक शुल्क जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

याशिवाय, प्राणी दत्तक घेणाऱ्या नागरिक व संस्थांना राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातर्फे छोटीशी प्रोत्साहनपर भेट दिली जाईल.

प्राणी दत्तक योजनेचे लाभ जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

चला, प्राणी संवर्धनाच्या या कार्यात आपला खारीचा वाटा उचलूया!

योजनेचे नियम व अटी जाणून घेण्यासाठी क्लिक करा