पुणे शहरातील गरजू व दुर्लक्षित समूहातील तरुणांच्या अंगी असलेल्या कौशल्यांचा विकास होऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी बळ मिळावे आणि त्यांचे चांगले भवितव्य घडावे यासाठी पुणे महानगरपालिकेने लाईट हाऊस प्रकल्प सुरु केला आहे.

पुणे शहरातील गरजू व दुर्लक्षित समूहातील तरुणांच्या अंगी असलेल्या कौशल्यांचा विकास होऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी बळ मिळावे आणि त्यांचे चांगले भवितव्य घडावे यासाठी पुणे महानगरपालिकेने लाईट हाऊस प्रकल्प सुरु केला आहे.

लाईट हाऊस प्रकल्प कशासाठी?

मोठ्या प्रमाणात पुरेशी पात्रता असलेले कार्यक्षम मनुष्यबळ उपलब्ध असल्याने भारत ज्ञानाधारित अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे. मात्र,  आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कीर्ती टिकवून ठेवण्यासाठी या मनुष्यबळाचा विकास आणि सक्षमीकरण करण्याची गरज आहे. तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या बाबतीत इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये सुधारणेला वाव आहे.

देशातील एकूण मनुष्यबळापैकी केवळ १० टक्के मनुष्यबळासच कौशल्यांचे प्रशिक्षण (२ टक्के औपचारिक; तर ८ टक्के अनौपचारिक प्रशिक्षण) दिले जाते. म्हणजेच देशातील एकूण कर्मचाऱ्यांपैकी ८० टक्के कर्मचाऱ्यांना कौशल्य प्रशिक्षण घेण्याची संधीच मिळत नाही. एकीकडे शिक्षण आणि प्रशिक्षणावर भर दिला जात असताना देखील अर्थव्यवस्थेच्या वाढत्या मागण्या पुरविण्यासाठी कुशल मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे.

फाऊंडेशन कोर्स 

समाजातील बरेचसे तरुण गोंधळलेल्या मानसिक अवस्थेत उदरनिर्वाहाच्या पर्यायांचा शोध घेतल्याचे चित्र नेहमीच दिसते. ही मंडळी आत्मविश्वासाअभावी केवळ दैनंदिन गरजा भागविणारे उत्पन्न देणारी उपजीविका स्विकारताना दिसतात.

तरुणांमधील अंतर्गत ऊर्जा स्रोत जागृत करुन त्यांना प्रेरणा देण्यासाठी लाईटहाऊस प्रकल्पामध्ये फाऊंडेशन कोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. या कोर्समध्ये मानवी क्षमतांचा विकास आणि प्रतिबिंब, ऐकण्याचे कौशल्य, सहानुभूती, सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची शक्ती इ. घटकांचा समाविष्ट आहे.

समुपदेशन आणि बाजारपेठ संशोधन

लाईटहाऊस प्रकल्पामधील समुपदेशक सहभागी तरुणांमधील कलागुण विकसित करुन त्यांना उपजीविकेची साधनं शोधण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, एखादा युवक जर वाहन क्षेत्रात काम करण्यास उत्सुक असेल तर त्याच्यामधील नैसर्गिक कौशल्ये योग्य कामासाठी वापरुन त्याला कार मेकॅनिक होण्यासाठी मदत करण्यात येते. काही काळानंतर तो स्वतःचे गॅरेजदेखील सुरु करु शकतो.

त्यासाठी सर्वप्रथम अशा तरुणाची आवड, प्रतिभा, बुद्धिमत्ता, आयुष्यातील परिस्थिती आणि नोकरीच्या संधी या सगळ्याची सांगड कशी घालता येईल याचा प्रयत्न समुपदेशक करतील.  प्रकल्पात सहभागी तरुण/तरुणी आपापल्या आवडीच्या व्यवसायात स्वयंसेवक/अप्रेंटिस म्हणून कामाचा अनुभव घेऊ शकतात आणि त्यात आणखी पुढे काम करायचे की नाही हे ठरवू शकतात. जर त्यांना हे काम आवडले नाही, तर ते इतर संधींचा शोध आणि लाभ घेऊ शकतात. लाईटहाऊसमध्ये प्रत्येकाला आपली कौशल्ये संपूर्णपणे विकसित करुन स्वतःचा शोध घेण्याची संधी दिली जाते.

कौशल्य प्रशिक्षण:

कौशल्य / व्यवसाय / शैक्षणिक कार्यक्रमएकदा तरुण/तरुणीने आपले आवडीचे क्षेत्र निवडले की पुढचा टप्पा म्हणजे आवश्यक कौशल्ये विकसित करणे किंवा त्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेणे. त्यामध्ये होम-शेफ आणि नर्सिंगपासून, आयटी कौशल्ये आणि इतर रोजगाराशी संबंधित कोर्सेसचा समावेश आहे.

शिक्षण संस्कृती

संपूर्ण कार्यक्रमाची अशा पद्धतीने रचना केली जाते की सहभागी प्रशिक्षणार्थींमध्ये स्वातंत्र्य आणि सर्जनशीलतेची भावना निर्माण होईल आणि त्यांना अधिक सहज पद्धतीने त्यांची आवड आणि सक्षम गुण शोधता येतील.

इंटर्नशिप आणि प्लेसमेंटः 

रोजगार/उद्योजकता/ उच्चशिक्षणाची कास तरुणांना नोकरी मिळविण्यासाठी तसेच सहकारी विद्यापीठांमध्ये व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेशाकरिता मदत केली जाते. लाईटहाऊसमध्ये एखादा अभ्यासक्रम पूर्ण करुन एखादा व्यवसाय सुरु करणाऱ्या किंवा उच्चशिक्षण घेणाऱ्या तरुणांना जर पुन्हा एखादे कौशल्य सुधारण्यासाठी किंवा नवे कौशल्य आत्मसात करण्यासाठी केव्हाही परत यायचे आल्यास त्यांचे स्वागत आहे.

सातत्याने काहीतरी नवे शिकण्याची सवय रुजविणे हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. शिक्षणकेंद्रीत अध्यापनशास्त्राद्वारे आजीवन शिकत राहण्याची मानसिकता रुजविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात.

त्यामध्ये खालील बाबींचा समावेश असतो –

1. मार्गदर्शन आणि प्रबोधन
2. तंत्रज्ञानाचा वापर करुन स्वावलंबी शिक्षण
3. समवयस्कांकडून शिक्षण-  टीम आधारित प्रकल्प, आव्हाने
4. कौशल्यांवर प्रभुत्व- कठोर मेहनत, फोकस,  सराव
5. अनुभवासह शिक्षण – कौशल्य आणि संकल्पनांचा वापर, प्रतिबिंब, कृती

स्किल्स मार्केटप्लेस (बाजारपेठेसंबंधीचे ऑनलाईन पोर्टल)

स्किल मार्केटप्लेस हे एक पोर्टल आहे ज्यावर सर्वांना आपल्या विशेष कौशल्यांचे मार्केटिंग करण्याची संधी मिळेल. उदाहरणार्थ, शहरातील प्लंबर, सुतार, स्वयंपाकी आणि इतर कुशल कामगारांना या पोर्टलवरुन आपल्या सेवांची जाहिरात करता येईल. युवक आपल्या सेवांची स्किल्स मार्केटप्लेसवर ऑनलाईन नोंदणी करू शकतात.  स्किल्स मार्केटप्लेसमार्फत सेवा पुरवठादार आणि ज्यांना सेवांची गरज आहे असे लोक एकमेकांशी जोडले जातात.

लाईटहाऊस उपक्रमांचा दीर्घकालीन प्रभाव
१.समाजामध्ये एकात्मतेची भावना निर्माण करुन समाजात व्यापक प्रमाणात परिवर्तन घडवून आणणे
२.कौशल्यवान आणि सक्षम तरुणाईचा बाजारपेठेत प्रवेश झाल्याने आर्थिक वाढीस चालना
३. तरुण नेतृत्वाच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सामुहिक ध्येय साध्य करण्याची जबाबदारी घेणे