कोणत्याही वस्तूचा किंवा सेवांचा मोबदला म्हणून दिलेल्या रकमेबद्दल मिळालेल्या पावतीला महत्त्व असते. विशेषत: मालमत्तेसंदर्भातील कराच्या पावतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मालमत्ता कराच्या पावतीमुळे मालमत्ताधारकाचा मालमत्तेवरील मालकी हक्क सिद्ध होतो आणि मालमत्ताधारक वेळोवेळी कर भरणारा कर्तव्यदक्ष नागरिक आहे हे ही सिद्ध होते.

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत मालमत्ता असणार्या नागरिकांना आता कर भरल्याची पावती अगदी सहजपणे प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी पुणे महानगरपालिकेने नागरिकांना ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे.
चला, तर मग जाणून घेऊयात कशी मिळवायची मालमत्ता कराची पावती?मालमत्ता कराची पावती मिळविण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे –

१. पुणे महानगरपालिकेच्या propertytax.punecorporation.org या संकेतस्थळाला भेट द्या. याच संकेतस्थळावर मालमत्ता कर ऑफलाईन / ऑनलाईन भरण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

या संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालील स्क्रिन दिसेल.

Get pune property tax receipt online PMC
“Tax Receipt” हा पर्याय निवडा

२. आता `Tax Receipt’ हा पर्यायावर क्लिक करा. आता विचारण्यात आलेली सर्व तपशील भरा. योग्य तपशील भरला आहे याची खात्री करून `सबमिट’ पर्याय निवडा.

येथे माहिती भरताना काही चूक झाली तर कदाचित तुम्हाला चुकीची पावती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे काळजीपूर्वक माहिती भरा.

Get pune property tax receipt online PMC
विचारण्यात आलेला सर्व तपशील भरावा

 

३. आता तुम्हाला तुमच्या मालमत्तेबाबतची माहिती समोर दिसेल. आता समोर दिसणार्या `Click Here to View Property Paid Details’ वर क्लिक करा.

Get pune property tax receipt online PMC
तुम्ही नोंदविलेल्या तपशील स्क्रीनवर उपलब्ध होईल

 

४. आता तुम्हाला तुमच्या मालमत्तेच्या यापूर्वी भरलेल्या कराची माहिती दिसेल. समोर दिसणार्या टेबल स्वरुपातील माहितीमध्ये Challan No. चा कॉलम दिसेल. आता तुम्हाला हव्या त्या Challan No. वर क्लिक करून तुम्ही संबंधित कर भरल्याची पावती प्राप्त करू शकता.

Get pune property tax receipt online PMC
Property Tax Challan Number

 

५. आता तुम्हाला समोर एक नवी स्क्रिन दिसेल. यामध्ये तुम्हाला तुम्ही निवडलेल्या चलनाची सविस्तर माहिती दिसेल. त्याखाली “Click to Print receipt” हा पर्याय दिसेल.

Get pune property tax receipt online PMC
तुम्ही निवडलेल्या चलनाची सविस्तर माहिती दिसेल

 

६. आता “Click to Print receipt” या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला खालील स्क्रिन दिसेल. आता समोर तुम्हाला पावती दिसेल.

ही पावती प्रिंट करण्यासाठी खालील “Print Receipt” हा पर्याय निवडा. याद्वारे आपण मालमत्ता कराची पावती प्रिंट करू शकता.

Get pune property tax receipt online PMC
पावती प्रिंट करण्यासाठी खालील “Print Receipt” हा पर्याय निवडा

 

अभिनंदन! आपण आपली मालमत्ता कर पावती यशस्वीरित्या प्राप्त केली आहे.

या सेवेप्रमाणे, पुणे महानगरपालिकेतर्फे अनेक ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पुणे शहराला एक स्मार्ट शहर बनविण्यासाठी पुणे महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे.

पुणे महानगरपालिकेच्या इतर ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा http://www.rts.punecorporation.org जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर ती इतरांसोबतही शेअर करा आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही उपयुक्त माहिती पोचवा.