संस्कृतीचं माहेरघर असलेलं ऐतिहासिक ओळख असलेलं आणि माहिती तंत्रज्ञानाचं अर्थात आयटीचं हब असलेलं पुणे संपूर्ण देशाच्या आकर्षणाचं केंद्र आहे. त्यामुळे पुण्याचा विकास वेगानं होत आहे. विकासाच्या प्रक्रियेत समस्येच्या स्वरुपातील काही आव्हानंही निर्माण होत असतात. सध्या पुणे शहरात वाहतूककोंडी हे एक प्रमुख आव्हान बनले आहे.

Pune-Cycle-Plan-Smart-City-PMC
विकासाच्या प्रक्रियेत दळणवळणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे वैयक्तिक वाहतूकीखेरीज अन्य पर्यायांचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळेच वाहतूककोंडीच्या समस्येवर मात करण्यासाठी सार्वजनिक वाहतूकीच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याशिवाय, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पूरक ठरणाऱ्यासायकलबाबतही चर्चा सुरु आहे.

सायकल चालवताना स्वतःचे आणि पर्यावरणाचे आरोग्य एकावेळी सुदृढराखण्याची सुवर्णसंधी मिळते, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.वाहनांचा वापर नियंत्रितकरण्यासाठी व सुदृढ आरोग्यासाठी सायकलिंग किती परिणामकारक आहे ही बाब सर्वज्ञात आहे.यामुळेच सायकल आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पुणे महानगरपालिका प्रयत्नशील आहे.

पुणे महानगरपालिकेने गेल्या काही महिन्यांपासून सायकल आराखड्याशी संबंधित सर्व घटकांशीसल्लामसलत, सर्व्हेक्षण, पायाभूत सुविधांबाबत शहराच्या सद्यस्थिताचा अभ्यास करून पुणे सायकलआराखड्याचा प्राथमिक मसुदा तयार केला आहे.

सायकल विभाग स्थापन करणे, ४७० कि.मी. लांबीचेसायकल नेटवर्क तयार करणे, सार्वजनिक सायकल सुविधा पुरविणे व सायकलिंगसाठी शहरात इतरपायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, या सर्व व्यवस्थेचे नियमन करणे आणि त्याबाबत नागरिकांमध्येप्रचार-प्रसार व जागरुकता आणि आराखड्याच्याअंमलबजावणीवर देखरेख या बाबींचा सायकल आराखड्याच्या प्रस्तावित मसुद्यामध्ये समावेश आहे.

Pune-Cycle-Plan-Smart-City-PMC
Making Pune Healthy And Pollution Free

पुणे शहरामध्ये सायकलविषयी आराखड्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच सायकल आराखड्यावर नागरिकांची मते, सूचना, अभिप्राय उपयुक्त ठरणार आहेत. पुणे शहरातील नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनीही या प्रक्रियेत आपली मते, सूचना, अभिप्राय नोंदवून सहभागी व्हावे.

नागरिकांनी आपल्या अभिप्राय ३० सप्टेंबरपर्यंत पाठवावेत. सायकल आराखड्याअंतर्गत प्रत्येकप्रस्तावासंबंधी आपल्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या online फॉर्मद्वारे खाली नमूद केलेल्यालिंकमध्ये देऊ शकता.

पुणे सायकल आराखड्याविषयी तपशीलवार माहिती वाचण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या: http://punecycleplan.wordpress.com

सायकल नेटवर्क नकाशा:

https://punecycleplan.wordpress.com/preliminary-draft/#cyclenetworkmap

सार्वजनिक सायकल व्यवस्था, प्रस्तावित स्थानकांची ठिकाणे: https://punecycleplan.wordpress.com/preliminary-draft/

हे प्राथमिक प्रस्ताव ३० सप्टेंबर, २०१७ पर्यंत नागरिकांच्या सूचना आणि अभिप्रायांसाठी खुले आहेत.
आपले अभिप्राय, पुणे शहरामध्ये सायकलविषयी सुधारणांसाठी नागरिकांच्या प्राथमिकता समजूनघेण्यास पुणे महानगरपालिकेस उपयुक्त ठरतील.

पुणे सायकल आराखड्याविषयीचे प्रकल्प आणि प्रकिया याविषयी अधिक माहिती जाणूनघेण्यासाठी कृपया खालील ठिकाणी संपर्क करा:

पुणे सायकल आराखडा, वाहतूक विभाग,
पुणे महानगरपालिका,
तिसरा मजला, वीर सावरकर भवन,
शिवाजीनगर, पुणे ४११००५
ई-मेल: punecycleplan@gmail.com, punecycleplan@punecorporation.org